Ankit Mohan New Movie | BABU | ’बाबू' शेठचा जलवा आता लवकरच | Sakal Media |

2022-02-22 6

सध्या विविध मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच आता त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'बाबू' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. सुरुवातीपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. त्यात आता टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने 'बाबू'विषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. हा एक ॲक्शनपट असून यात 'बाबू'ची भूमिकाअंकित मोहन साकारत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात रुचिरा जाधव,नेहा महाजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.